Sunday, May 31, 2020

एक प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे , रत्नागिरी

एक विलक्षणीयअनुभव गणपतीपुळे 



गणपतीपुळे हे क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले आहे. तसेच गणपतीपुळे ला परमेश्वराचा वरदहस्त सुद्धा संबोधले जाते . गणपतीपुळे , पावस , मार्लेश्वर असे अनेक तीर्थक्षेत्र मोठ्या दिमाखात रत्नागिरी जिल्ह्यात  उभे आहेत.  रत्नागिरी जिल्हा संपूर्ण बाजुने समृद्ध आहे.  अगदी माणसांपासून निसर्गापर्यंत सर्व काही आपलेसे करणारे आहे. कोकणातील माणसं तर पाहुण्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार करायला नेहमी सज्ज असतातच. पण निसर्गाचा कुशीत वसलेले कोकण पण आपल्याला नेहमी खुणावत राहते. 



रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र आहे. गणेशाची स्वयंभू मूर्ती सुद्धा तेथे प्रस्थापित आहे. असे हे स्थान अतिशय नयनरम्य आणि मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीर्थक्षेत्र समुद्र किनारी वसलेले आहे.  समुद्र किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल.  म्हणजेच मंदिरातून बाहेर पडल्यावर आपल्याला लगेच समुद्राचे दर्शन होते . अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा मात्र तेथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. 



गळ्यात म्हत्वाचे म्हणजे गणपतीची स्वयंभू मूर्ती ४०० वर्षांपूर्वीची आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि पश्चिमेला असणाऱ्या अरबी सुमुद्रामुळे हे मंदिर आगळे वेगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे. 

राहण्याची सोय :
 गणपतीपुळे येथे महाराष्ट राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) विश्रामगृह आहे. तसेच तेथे बरेचशे हॉटेल्सची सुविधा सुद्धा आहे. जिथे आपण राहू शकतो. 



कसे जावे :



रेल्वे  : 
तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात.  

बस: गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते. 

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला , आरेवारे समुद्रकिनारा.



















No comments:

Post a Comment

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा  प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...