छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी "रायगड किल्ला "
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेच . महाराजांचे शौर्य , महाराजांचे पराक्रम , महाराजांचे कर्तृत्व , त्यांची गौरवगाथा ऐकूनच आपण लहानाचे मोठे झालो. महाराजांचा पराक्रमासोबत त्यांच्या किल्ल्यांची देखील आपणाला असणे गरजेचे आहे. आज मी तुम्हाला या लेखात शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या असलेल्या "रायगड किल्ल्या " विषयी माहिती सांगणार आहे .
रायगड किल्ल्याची माहिती -
रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ८२० मीटर म्हणजेच अंदाजे २७०० फूट उंचीवर
वसलेला आहे . रायगडचे पूर्वीचे नाव "रायरी " आहे . म्हणजेच रायगड ला पूर्वी "रायरी" म्हणून ओळखले जायचे. रायगडवर पोहोचायला जवळ - जवळ १४००-१४५० पायऱ्या चढाव्या लागतात.
" रायगड " छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कसा ठरला ?
यशवंतराव मोरे हा जावळीचा प्रमुख एकदा पळून येऊन रायगड किल्ल्यावर राहिला होता. त्यावेळी १६ एप्रिल १६५६ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला वेढा घातला. त्यानंतर साधारणपणे मे महिन्यात "रायगड" हा शिवरायांचा ताब्यात आला. मुल्ला अहमद कल्याणचा सुभेदाराकडून जो खजिना लुटण्यात आला. त्याचा उपयोग पुढे रायगडाचा बांधकामाकरिता करण्यात आला. रायगडाचे मुख्य वास्तुविशारद होते "हिरोजी इंदुलकर ".
रायगड हा शत्रूला हल्ला करण्यासाठी तास अवघड आणि अडचणीची जागा असल्यामुळे आणि समुद्रमार्गे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रायगड सोयीस्कर असल्याने शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची केली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील याच रायगडावर झाला होता. रायगडाने अनुभवलेला हा सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी अशी संस्मरणीय घटना होय.
रायगड किल्ल्याचे कौतुक करताना महाराज त्यावेळी बोलले होते -
"दीड गाव उंच -देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा. पावसाळ्यात कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे पाहून महाराज आनंदाने बोलले - तख्तास जागा हाच गड करावा."