शेअरबाजार शिकायचाय?
पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची तरतूद म्हणून आपण बचत करतो, गुंतवणूक करतो. आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच.शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ‘‘शेअर बाजारात पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत.
शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. वर्तमानपत्रे, इंटरनेटवरील साइट्स, शेअरबाजाराविषयी माहिती देणारे चॅनेल्स याद्वारे बरीच माहिती मिळू शकते. यासाठी मी तुम्हाला पुढील विडिओ शेअर करीत आहे . तो तुम्ही नक्की पहा
No comments:
Post a Comment