शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती एक कविता
कष्ट काय चुकत नाय , रान काय पिकत नाय
अन हेरलेल्या धोतराने लाज काही झाकत नाय .
मुकी गुर दावणीला , पडीक पडली शेती
दिवसभर नसती लाईट ,रातच्याला येति
पिकलच कधी धान , तर चांगल्या भावात विकत नाय
अन हेरलेल्या धोतराने लाज काय झाकत नाय .
पॅकेजच्या घोषणा देण्यात नेते झाले निष्णात ,
आश्वासनांची खैरात असते फक्त त्यांचा भाषणात.
शेतकर्यांवर फायद्यांचे धोरण कोणी आखातच नाय ,
अन हेरलेल्या धोतराने लाज काय झाकत नाय.
भीक नको पण कुत्रा आवर, म्हणावसं वाटतंय
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळीज मात्र फाटतंय .
मरतोय रोज शेतकरी , तरी सरकार काय शिकत नाय.
कष्ट काय चुकत नाय , रान काय पिकत नाय
अन हेरलेल्या धोतराने लाज काही झाकत नाय .
No comments:
Post a Comment