Friday, April 10, 2020

पोलीस एक रक्षक

                       कोरोना एक संकट 

          आज  आपल्या भारतावर एक मोठे संकट येऊन थांबले आहे.  पण लोकांना त्याचे काहीच गांभीर्य वाटत नाही. पण लोक बिनदास्त  बाहेर फिरताना दिसत आहेत . त्यांना कोणत्या गोष्टीचे गांभीर्यच नाही . आपले पोलीस इतके जीव तोडून आपल्याला सांगतात की बाहेर पडू नका , घरातच राहा पण नाही आपल्याला घरात करमत नाही ना . आपण पडतो बाहेर बिनधास्त कोणाची तमा न बाळगता,"अरे मूर्ख लोकांनो त्यांचे तर ऐका , जे आपले घरदार सोडून जीवाची पर्वा न करता,आपल्यासाठी  दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून आपले संरक्षण करतात ."
         


             पण आपण लोक काय करतो . त्यांनाच उलटे बोलून निघून जातो . काही दिड शहाणे  तर असे वागतात कि ते आपल्यावर उपकार म्हणूनच  रस्त्यावर उभे राहून आपली मदत करतात . पण त्यांचा हे लक्षात येत नाही कि त्यांची पण फॅमिली आहे . त्यांची पण कोणी तर वाट पाहत असतो घरी पण ते सगळे विसरून आपल्यासाठी अहोरात्र काम करत असतात . 

             काही दिवसापूर्वी  मी एक विडिओ पाहिली होती .जी व्हायरल पण झाली होती. कि एक लहान मुलगा आपल्या वडिलांना बाहेर जाऊ देत नव्हता . आणि सारखा बोलत होता .बाबा बाहेर जाऊ नका ,"बाहेर कोरोना आहे ". त्या लहान मुलाचे बाबा एक पोलीस होते . 

            
                           
               

           त्यामुळे कृपा करून आपल्या साठी नाही तर त्या पोलिसांचा मुलांसाठी तर घरीच राहा . तुम्हाला तुमचा जीव महत्वाचा नसेल , पण त्या लहान लहान मुलांना त्यांच्या  आपल्यांचा  जीव खूप महत्वाचा  आहे.  जर तुम्ही घरी राहाल तर आपण जे संकट आपल्या देशावर आले आहे त्याचा सामना नक्की करू शकू . 
            जे पोलीस , नर्सेस  इत्यादी  आपल्यासाठी अहोरात्र  घेत  आहेत .  त्यांचा साठी आपण काही  करू शकत नाही .  पण हा आपण हे नक्कीच करू  शकतो आपण घरी बसून त्यांना मदत नक्कीच करू शकतो. त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा .  STAY HOME SAVE LIVES 

No comments:

Post a Comment

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा  प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...