Thursday, May 28, 2020

"कराड" म्हणजे आमच्या 'यशवंतनगरी ' बद्दल बरंच काही





                                 कराड

         "कराड" शहर  भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्यातील दक्षिणेकडे वसलेले आहे . जे मुंबई पासून ३२० किमी आणि पुणेपासून १५९ किमी अंतरावर वसलेले आहे .  कराड हे शहर कोयना नदी आणि कृष्णा नदीच्या  संगमावर वसलेले आहे ज्याला आम्ही "प्रीतिसंगम" असे म्हणतो. या दोन नद्या महाबळेश्वर मध्ये उगम पावतात. 

महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटक क्षेत्र आहे . जे सातारा जिल्ह्यातच स्थित आहे आणि जे कराड पासून १०० किमी दूर आहे . आणि त्या दोन नद्या म्हणजेच कृष्णा नदी आणि कोयना नदी आपल्या मूळ ठिकाणाहून म्हणजेच महाबळेश्वर मधून विभक्त होतात आणि समान अंतरावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास करून त्या "कराड " मध्ये भेटतात, ज्याला आपण  "प्रीतिसंगम " असे म्हणतो. "प्रीतिसंगम" म्हणजेच  " प्रेमसंगम ".

"कराड " हे शहर अजून एका गोष्टीसाठी ओळखले जाते ते म्हणजे 'साखर उत्पादनासाठी '. कराड शहराला "साखरेचे भांडे " म्हणूनही ओळखले जाते . कारण कराड तालुक्यात बरेच साखर कारखाने उभे आहेत . कराडला पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे केंद्र मानले आहे कारण कराड मध्ये प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. हे स्थळ विश्रांती स्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते.

 महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय . यशवंतराव  चव्हाण यांची समाधी सुद्धा कृष्णा आणि कोयनेचा संगमावर म्हणजेच "प्रीतिसंगमावर " वसलेले आहे . सर्वात अभिमानाची बाब म्हणजे 'भारत सरकारने' चालू  केलेल्या "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " च्या अंतर्ग
त पारितोषिक सुद्धा भेटले आहे .  


No comments:

Post a Comment

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा  प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...