Tuesday, June 18, 2024

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा 




प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत बरोबरीनेच परदेशात सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या नावाने त्यांनी मार्केट मध्ये खूप चांगले नाव कमावले आहे. पण त्याचा बरोबरीनेच एक अशी एक घटना आहे जी खूप कमी लोकांना माहिती असेल. ही घटना आहे इस १९२० सालची तेव्हा रोल्स रॉयस ( Rolls Royce ) हा खूप मोठा आणि महागडा ब्रँड मानला जात होता. जे फक्त राजा आणि महाराजा खरेदी करू शकत होते. 

लंडन मध्ये एका सेल्स मन (Salesman ) ने केला होता महाराजा जय सिंह यांचा अपमान 

महाराजा जय सिंह प्रभाकर ( Jay Sinh Prabhakar ) हे अल्वर (Alwar) चे महाराजा होते. ते एकदा लंडन ( Landon ) चा रस्त्यावर फिरायला निघाले. तेव्हा त्यांना रॉल्स रॉयस ( Rolls Royce ) चे शो रूम दिसले. आणि ते शो रूम पाहायला आत गेले . तेव्हा ते सामान्य कपड्यात होते आणि चेहऱ्यावर भारतीय असण्याचा गर्व दिसत होता . तेव्हा त्यांनी सेल्समन ला गाडी ची किंमत विचारली पण  त्या  उद्दाम सेल्समन त्यांना अडवले. 





हॉटेल वर जाऊन सेवकांना आदेश दिला 

साधारण पेहराव आणि भारतीय चेहरा पाहून त्याने त्यांची खिल्ली उडवली आणि त्यांना हाकलून लावले. महाराज जय सिंह यांना हा अपमान सहन नाही झाला त्यांनी तडक हॉटेल ला जाऊन आपली सेवकांना आदेश दिला की रोल्स रॉयस ( Rolls Royce ) शोरूम ला जाऊन त्यांना सांगा कि अल्वर ( Alwar ) चे महाराजा जय सिंह त्यांचा शोरूम ला भेट द्यायला येणार आहेत. सेवकांनीही तसेच केले. 



शोरूम ला जाऊन महाराजा जय सिंह यांनी खरेदी केल्या ६ रोल्स रॉयस ( Rolls Royce ) गाड्या 

सेवकांनी शोररोम मध्ये जाऊन सूचना दिल्या नंतर महाराज्यांचा आगमनाची संपूर्ण तयारी करण्यात आली. त्यांचा स्वागताला लाल रंगाची कालीन पसरवण्यात आली. महाराजा जय सिंह आपल्या शाही पेहरावात शोरूम मध्ये पोहोचले तेव्हा त्या सेल्समन चा त्याचा डोळ्या वर विश्वास बसत नव्हता . की काही वेळापूर्वी आपण ज्याला हाकलून दिले तो एक महाराजा होता. त्यानंतर त्यांनी ६ रोल्स रॉयस (Rolls Royce ) खरेदी केल्या. 




गाड्या घेऊन भारतात आले 

रोल्स रॉयस ( Rolls Royce ) घेऊन महाराज जय सिंह भारतात आले. त्यांनी  आदेश दिला कि परदेशातून आणलेल्या ६ गाड्या नगरपालिकेला दान देण्यात याव्यात आणि त्या गाड्यांनी  कचरा काढण्याचे काम करण्यात यावे. त्यानंतर ( Municipalty ) त्या गाड्यांचा उपयोग शेण काढण्यासाठी, तसेच रस्ता साफ करण्यासाठी , कचरा काढण्यासाठी उपयोग होऊ लागला. 

रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ने माफी मागितली 

जेव्हा भारतातील रस्त्यावर असा कारनामा झाला तेव्हा सगळे आश्चर्यचकीत झाले आणि बघता बघता ही खबर सगळीकडे वाऱ्यासारखी  पसरली. जेव्हा ही  खबर ब्रिटेन ( Britain ) पर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का लागला. त्यानंतर रोल्स रॉयस ( Rolls Royce ) चा मालकाने सेल्समन कडून माफीनामा लिहून  महाराजा जय सिंह यांना  पाठवून दिले  आणि त्यांचा  सेल्समन कडून झालेल्या चुकीची माफी मागितली आणि अजून काही गाड्या भेट म्हणून दिल्या. 

महाराजा जय सिंह या माफीनाम्याने खूप खुश होतात आणि नगरपालिकेला आदेश देऊन गाड्यांची कचरा काढण्याचे काम बंद करतात. अशा प्रकारे महाराजा जय सिंह यांनी आपल्या अपमानाचा बदल ब्रिटिशांकडून घेतात. 
















2 comments:

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा  प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...