Monday, May 22, 2023

रंग महल...एक असे मंदिर जिथे अशी मान्यता आहे कि भगवान कृष्णा रात्री निवास साठी येतात


भारत देश हा एक असा देश आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती,संस्कार आणि वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. अशा गोष्टी ऐकूम आपण सगळेच भारावून जातो. 

जगात कोणत्याही देशात अशा गोष्टी बघायला आणि ऐकायला मिळणार नाहीत. 

जेव्हा आपण कृष्ण नगरी मथुरा - वृदांवन मध्ये जातो. तिथे तुम्हाला असे एक मंदिर भेटेल. जिथे असा बोलले जाते कि तिथे अजून कृष्णा भगवान येतात.दररोज पहाटे या मंदिराचा दरवाजा उघडला जातो.रात्री जेव्हा दरवाजा बंद करायची वेळ येते तेव्हा एक विशिष्ट प्रकारची तयारी केली जाते. एक पलंग सजवला जातो जिथे अशी मान्यता आहे के ते आराम करतात.तसेच त्यांच्या साठी खाण्या पिण्याचा गोष्टी ठेवल्या जातात त्यांचा साठी लोणी ठेवले जाते जे त्यांना खूप आवडते,मिठाई वगैरे वगैरे आणि देवाला भोग लावला जातो. 

आता तुम्ही म्हणाल कि यात काय वेगळी गोष्ट आहे हे तर सामान्य आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट हि आहे कि जेव्हा पहाटे मंदिराचे पुजारी दरवाजा उघडतात तेव्हा तिकडे पलंग असा असतो जसे कोणी तरी तिथे रात्री झोपले असेल आणि जे काही भोग लावण्यासाठी ठेवलेले प्रसाद असतो तो अर्धा खाऊन ठेवलेला असतो,लोणी थोडा खाल्लेला असतो. 

 

 



निधीवान जिथे आज पण  श्री कृष्णा  रासलीला खेळतात. 

या जागेवर मंदिराचा आजूबाजू एक घनदाट वन सुद्धा आहे. हे एक रहस्यमयी स्थान आहे. तिथे राहणारे लोक सांगतात कि निधीवन मध्ये आज सुद्धा श्री कृष्णा आणि राधा मध्यरात्री नंतर रासलीला खेळतात. वन मध्ये जे तुम्हाला झाडी दिसतात त्या गोपिकांचा स्वरूपात रासलीला खेळायला येतात. 

 



निधीवन मध्ये रात्री कोणालाही थांबायची परवानगी नाही 

या वनामध्ये जिथे श्री कृष्णा रासलीला खेळतात तिथे रात्री थांबण्यास मनाई आहे. त्याचा पाठी मागे एक कारण सांगितले जाते.आतापर्यंत दोघांनी रात्री वनामध्ये लपून बसून श्री कृष्णाचे दर्शन करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वेडे झाल्याचे आढळून आले.त्यांतील एकाची समाधी सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. 

निधीवन तुम्हाला सकाळ पासून सायंकाळ पर्यंत दर्शनासाठी खुले असते. तुम्ही या वेळेत मंदिर मध्ये जाऊन दर्शन आणि प्रसाद घेऊ शकता.तसेच या मंदिराबद्दल बरीच माहिती Youtube  वर भेटू शकेल. आणि या सगळ्या फक्त  गोष्टी नाहीत तर एक आस्था आहे. आणि लोक विचारतात असे कसे वेडे झाले जे तिथे थांबले होते ते. पण मला असे वाटते कि जसे एक Operation  करण्यासाठी Doctor ची पदवी लागते. जसे कोणाची Court मध्ये case लढाईला Lawyer चा अभ्यास करावा लागतो तसेच देवाला पाहण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी अंगात देवपण असणे खूप गरजेचे आहे.त्यांचा तो विराट रूप तो अनुभव घेतल्यानंतर जगायची इच्छाच राहत नसेल. मला आले वाटते. आणि बरीच माहिती Internet, Youtube  उपलब्ध आहे.












No comments:

Post a Comment

असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.

रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा  प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...