Bhagyatalk
Tuesday, June 18, 2024
असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.
Monday, May 22, 2023
रंग महल...एक असे मंदिर जिथे अशी मान्यता आहे कि भगवान कृष्णा रात्री निवास साठी येतात
भारत देश हा एक असा देश आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती,संस्कार आणि वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. अशा गोष्टी ऐकूम आपण सगळेच भारावून जातो.
जगात कोणत्याही देशात अशा गोष्टी बघायला आणि ऐकायला मिळणार नाहीत.
जेव्हा आपण कृष्ण नगरी मथुरा - वृदांवन मध्ये जातो. तिथे तुम्हाला असे एक मंदिर भेटेल. जिथे असा बोलले जाते कि तिथे अजून कृष्णा भगवान येतात.दररोज पहाटे या मंदिराचा दरवाजा उघडला जातो.रात्री जेव्हा दरवाजा बंद करायची वेळ येते तेव्हा एक विशिष्ट प्रकारची तयारी केली जाते. एक पलंग सजवला जातो जिथे अशी मान्यता आहे के ते आराम करतात.तसेच त्यांच्या साठी खाण्या पिण्याचा गोष्टी ठेवल्या जातात त्यांचा साठी लोणी ठेवले जाते जे त्यांना खूप आवडते,मिठाई वगैरे वगैरे आणि देवाला भोग लावला जातो.
आता तुम्ही म्हणाल कि यात काय वेगळी गोष्ट आहे हे तर सामान्य आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट हि आहे कि जेव्हा पहाटे मंदिराचे पुजारी दरवाजा उघडतात तेव्हा तिकडे पलंग असा असतो जसे कोणी तरी तिथे रात्री झोपले असेल आणि जे काही भोग लावण्यासाठी ठेवलेले प्रसाद असतो तो अर्धा खाऊन ठेवलेला असतो,लोणी थोडा खाल्लेला असतो.
निधीवान जिथे आज पण श्री कृष्णा रासलीला खेळतात.
या जागेवर मंदिराचा आजूबाजू एक घनदाट वन सुद्धा आहे. हे एक रहस्यमयी स्थान आहे. तिथे राहणारे लोक सांगतात कि निधीवन मध्ये आज सुद्धा श्री कृष्णा आणि राधा मध्यरात्री नंतर रासलीला खेळतात. वन मध्ये जे तुम्हाला झाडी दिसतात त्या गोपिकांचा स्वरूपात रासलीला खेळायला येतात.
निधीवन मध्ये रात्री कोणालाही थांबायची परवानगी नाही
या वनामध्ये जिथे श्री कृष्णा रासलीला खेळतात तिथे रात्री थांबण्यास मनाई आहे. त्याचा पाठी मागे एक कारण सांगितले जाते.आतापर्यंत दोघांनी रात्री वनामध्ये लपून बसून श्री कृष्णाचे दर्शन करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वेडे झाल्याचे आढळून आले.त्यांतील एकाची समाधी सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.
निधीवन तुम्हाला सकाळ पासून सायंकाळ पर्यंत दर्शनासाठी खुले असते. तुम्ही या वेळेत मंदिर मध्ये जाऊन दर्शन आणि प्रसाद घेऊ शकता.तसेच या मंदिराबद्दल बरीच माहिती Youtube वर भेटू शकेल. आणि या सगळ्या फक्त गोष्टी नाहीत तर एक आस्था आहे. आणि लोक विचारतात असे कसे वेडे झाले जे तिथे थांबले होते ते. पण मला असे वाटते कि जसे एक Operation करण्यासाठी Doctor ची पदवी लागते. जसे कोणाची Court मध्ये case लढाईला Lawyer चा अभ्यास करावा लागतो तसेच देवाला पाहण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी अंगात देवपण असणे खूप गरजेचे आहे.त्यांचा तो विराट रूप तो अनुभव घेतल्यानंतर जगायची इच्छाच राहत नसेल. मला आले वाटते. आणि बरीच माहिती Internet, Youtube उपलब्ध आहे.
Monday, May 15, 2023
The famous story of Lakshagrah in Mahabharat
The famous story of Lakshagrah in Mahabharat
What is Lakshagraha in Mahabharat?
Lakshagraha was a house which was made on the orders of Duryodhana. In Mahabharata, Lakshagraha plays an important role.The Kauravas had built this cave and plotted to burn Pandavas alive. But the Pandavas saved their lives through the narrow road.Duryodhana was enmity with the pandavas from the beginning and every time he kept plotting to kill them. His uncle Shakuni was giving full support in his work. Once Duryodhana prepared a plan to eliminate Pabdavas along with their families.This plan of Duryodhana was very Dangerous.Duryadhana build Lakshagraha in Vanavrit.Its ruins ara found in Barnawa area of baghpat district. A tunnel built in this palace opens near the Hindon river.
How Duryodhana Convinced his Father ?
Duryodhan also took help of his father to make his plan successful. Duryodhan began to realize that Yudhishthira had become popular among the people of Hastinapur. Impressed by these qualities, Bhishma has even expressed his desire to enthrone his grandfather Yudhishthira. In such situation, Duryodhana had decided that he would not left this happen at any cost. So he said to his father, "Father"! If once Yudhishthira gets the throne, then this Kingdom will belong to the Pandavas forever. The Kauravas will remain their servants. Dhritarashtra, explaining to Duryodhana, said that son Duryodhana! Yudhishthira's children This is why he has authority over this kingdom. Then Bhishma and his subjects also want to make him king." Explaining to Duryodhana, Dhritarashtra said son Duryodhana ! Yudhishthira is the biggest among the sYudhishthira is the biggest among the sons and therefore he has the right to this kingdom. Then Bhishma and the people also want to make him king." Hearing the words of Dhritarashtra, Duryodhana said, "Father! I have arranged it, just tell me somehow to send the Pandavas to Warnawat."
After finding out the plan, the Pandavas started taking measures to protect themselves. The tunnel is ready. Then one day Yadhishthira said to Bhimsen, "Bhim! Now we all should get out of here by burning the wicked Purochan in this Lakshagriha." Bhima took Purochan prisoner the same night and set the palace on fire. Yudhishthira came out safely through the tunnel along with mother Kunti and brothers. But when Duryodhana came to know about the escape of the Pandavas, he got very angry at the failure of his plan and again started preparing for a new plan.
Saturday, October 9, 2021
रायगड - मराठयांचे तीर्थक्षेत्र बद्दल बरेच काही
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी "रायगड किल्ला "
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेच . महाराजांचे शौर्य , महाराजांचे पराक्रम , महाराजांचे कर्तृत्व , त्यांची गौरवगाथा ऐकूनच आपण लहानाचे मोठे झालो. महाराजांचा पराक्रमासोबत त्यांच्या किल्ल्यांची देखील आपणाला असणे गरजेचे आहे. आज मी तुम्हाला या लेखात शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या असलेल्या "रायगड किल्ल्या " विषयी माहिती सांगणार आहे .
रायगड किल्ल्याची माहिती -
रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ८२० मीटर म्हणजेच अंदाजे २७०० फूट उंचीवर
वसलेला आहे . रायगडचे पूर्वीचे नाव "रायरी " आहे . म्हणजेच रायगड ला पूर्वी "रायरी" म्हणून ओळखले जायचे. रायगडवर पोहोचायला जवळ - जवळ १४००-१४५० पायऱ्या चढाव्या लागतात.
" रायगड " छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कसा ठरला ?
यशवंतराव मोरे हा जावळीचा प्रमुख एकदा पळून येऊन रायगड किल्ल्यावर राहिला होता. त्यावेळी १६ एप्रिल १६५६ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला वेढा घातला. त्यानंतर साधारणपणे मे महिन्यात "रायगड" हा शिवरायांचा ताब्यात आला. मुल्ला अहमद कल्याणचा सुभेदाराकडून जो खजिना लुटण्यात आला. त्याचा उपयोग पुढे रायगडाचा बांधकामाकरिता करण्यात आला. रायगडाचे मुख्य वास्तुविशारद होते "हिरोजी इंदुलकर ".
रायगड हा शत्रूला हल्ला करण्यासाठी तास अवघड आणि अडचणीची जागा असल्यामुळे आणि समुद्रमार्गे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रायगड सोयीस्कर असल्याने शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची केली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील याच रायगडावर झाला होता. रायगडाने अनुभवलेला हा सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी अशी संस्मरणीय घटना होय.
रायगड किल्ल्याचे कौतुक करताना महाराज त्यावेळी बोलले होते -
"दीड गाव उंच -देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा. पावसाळ्यात कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे पाहून महाराज आनंदाने बोलले - तख्तास जागा हाच गड करावा."
Friday, July 17, 2020
बॉलीवूड मध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्री असेही असतात, ज्यांची चर्चा फक्त अभिनयामुळे नाही तर त्यांचा वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहतात.त्यातील एक म्हणजे नर्गिस आणि सुनील दत्त.
नर्गिस आणि सुनील दत्त यांची कहाणी इथून चालू होते जेव्हा सुनील दत्त सीलोन रेडिओ मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते . त्या काळात अभिनयही त्यांचा कोणताच संबंध नव्हता. पण कोणाला माहित होते कि इथेच त्यांची नर्गिस सोबत पहिली भेट होईल. रेडिओ वर त्यांना नर्गिस यांची मुलाखत घेण्याचे काम मिळाले होते. मुलाखत घेण्याचा वेळी ते इतके नर्व्हस झाले होते कि त्यांना एक प्रश्न पण विचारता आला नाही. त्यांची नोकरी जाण्याची वेळ अली होती. तेव्हा नर्गीस एक खूप मोठी अभिनेत्री झाली होती आणि त्यांची आणि राज कपूर यांची जोडी खूप हिट मानली जायची.
दुसऱ्यांदा त्यांची भेट झाली ती म्हणजे बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन " च्या सेट वर. नर्गिस तिथे बिमल रॉय ला भेटायला आली होती आणि सुनील दत्त तिथे कामाचा शोधात आले होते. सुनील ला बघितल्या वर नर्गिस ला त्यांची पहिली भेट आठवली आणि हसत त्या तिथून निघून गेल्या. त्या नंतर मेहबूब खान च्या "मदर इंडिया " या चित्रपटात त्यांना नर्गिस यांचा मुलाची भूमिका मिळाली.
चित्रपटाचा चित्रीकरणा वेळी सुनील दत्त अनेक वेळा नर्गिस समोर अभिनयच विसरून जायचे. पण त्या वेळी नर्गिस यांनी सुनील दत्त यांना खूप मदत केली होती . त्यामुळे सुनील दत्त सहज अभिनय करू शकले. नर्गिसचा हा स्वभाव पाहून सुनील दत्त यांना त्यांच्याशी सहानभूती वाटू लागली.
असं सांगितले जाते कि "मदर इंडिया" या सिनेमात पहिल्यांदा दिलीप कुमार यांना घेणार होते पण नंतर दिलीप कुमार यांनी नकार दिला. कारण त्यांना नर्गिस यांच्या मुलाची भूमिका नको होती कारण ती त्यांची अभिनेत्री राहिली होती. पण दिग्दर्शक मेहबूब खान यांनी त्यांना डबल रोल साठी पण विचारले पण त्यांनी नकार दिला मग हा रोल सुनील दत्ता यांना मिळाला.
त्यांचा आयुष्यात एक घटना अशी घडली कि ते दोघे कायमचे जवळ आले. गुजरातच्या बिलमोर गावात "मदर इंडिया "या चित्रपटाचे सेट लावले होते. तेव्हा चित्रीकरण करण्यासाठी चारीबाजूने वाळलेले गवत लावलेले होते. चित्रीकरण करण्यासाठी त्या गवतात आग लावली गेली . पण बघता बघता आग खूप वाढली. तेव्हा सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचा जीव वाचवला पण स्वतः खूप जखमी झाले. ते इतके भाजले गेले कि त्यांना सारखी चक्कर यायची. त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करायला लागले.
नर्गिस रोज दवाखान्यात जाऊन सुनील दत्त यांचा सांभाळ करत असे. आगीचा हादसा झाल्यानंतर नर्गिस यांचा सुनील दत्त याना बघायचा दृष्टिकोनच बदलून गेला.
एकदा सुनील दत्त यांची बहीण आजारी पडली होती. त्यांना मुंबई मध्ये डॉक्टर्स जास्त माहित नव्हते. तेव्हा सुनील दत्त यांना न सांगता त्या त्यांचा बहिणीला डॉक्टर कडे घेऊन गेल्या. सुनील दत्त याना नर्गिस पहिल्या पासूनच आवडत होत्या पण या घाटाने नंतर त्यांनी पक्क केलं कि आयुष्य घालवायचं तर नर्गिस सोबत. नंतर त्यांनी नर्गिस ला प्रोपोस केलं आणि नर्गिस ने पण स्वीकार केला. नंतर त्यांनी लग्न केलं.
Monday, June 1, 2020
तुम्हाला माहिती आहे का ? कोपेश्वर मंदिर म्हणजेच खिद्रापूर येथे घडलेली ऐतिहासिक घटना
कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात वसलेल्या खिद्रापूर या गावी महादेवाचे कोपेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे . कृष्णा नदीचा काठावर वसलेले हे मंदिर आकर्षणाचा भाग बनले आहे ते म्हणजे "कट्यार काळजात घुसली " या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रिकरण म्हणजेच "शिव भोला भंडारी" या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाले आहे. त्यामुळे खूप दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
आख्यायिका
या मंदिरातील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. जो रागावून येथे येऊन बसला होता. महादेवाची पहिली पत्नी म्हणजेच दक्ष कन्या 'सती ' च्या जाण्याने महादेवाला राग अनावर झाला होता. 'सती 'च्या अचानक जाण्याने कोपलेला असा हा महादेव "कोपेश्वर ". मग त्यांची समजूत काढण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता होती. मग हे काम श्री विष्णूने केले . त्यांचे नाव आहे धोपेश्वर. या मंदिराचा गर्भगृहात दोन शाळुंका आहेत . एक म्हणजे कोपेश्वर आणि दुसरा थोडा उंच म्हणजे "धोपेश्वर ". दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात "नंदी " नाही. कदाचित कालौघात आणि आक्रमणांमुळे त्यांचे स्थलांतर झाले आहे. हा नंदी खिद्रापूर पासून १२ किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटकातील "येडूर" या गावी आहे . या गावी फक्त "नंदी"चे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कंदाची दुर्मिळ उदाहरण असेल. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे.आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
इतिहास
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.
मंदिराचे सौंदर्य
देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.
मंदिराची रचना
मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.
सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
Sunday, May 31, 2020
एक प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे , रत्नागिरी
गणपतीपुळे हे क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले आहे. तसेच गणपतीपुळे ला परमेश्वराचा वरदहस्त सुद्धा संबोधले जाते . गणपतीपुळे , पावस , मार्लेश्वर असे अनेक तीर्थक्षेत्र मोठ्या दिमाखात रत्नागिरी जिल्ह्यात उभे आहेत. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण बाजुने समृद्ध आहे. अगदी माणसांपासून निसर्गापर्यंत सर्व काही आपलेसे करणारे आहे. कोकणातील माणसं तर पाहुण्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार करायला नेहमी सज्ज असतातच. पण निसर्गाचा कुशीत वसलेले कोकण पण आपल्याला नेहमी खुणावत राहते.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र आहे. गणेशाची स्वयंभू मूर्ती सुद्धा तेथे प्रस्थापित आहे. असे हे स्थान अतिशय नयनरम्य आणि मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीर्थक्षेत्र समुद्र किनारी वसलेले आहे. समुद्र किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. म्हणजेच मंदिरातून बाहेर पडल्यावर आपल्याला लगेच समुद्राचे दर्शन होते . अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा मात्र तेथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे गणपतीची स्वयंभू मूर्ती ४०० वर्षांपूर्वीची आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि पश्चिमेला असणाऱ्या अरबी सुमुद्रामुळे हे मंदिर आगळे वेगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे.
राहण्याची सोय :
गणपतीपुळे येथे महाराष्ट राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) विश्रामगृह आहे. तसेच तेथे बरेचशे हॉटेल्सची सुविधा सुद्धा आहे. जिथे आपण राहू शकतो.
कसे जावे :
रेल्वे :
तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात.
बस: गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला , आरेवारे समुद्रकिनारा.
Thursday, May 28, 2020
"कराड" म्हणजे आमच्या 'यशवंतनगरी ' बद्दल बरंच काही
कराड
"कराड" शहर भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्यातील दक्षिणेकडे वसलेले आहे . जे मुंबई पासून ३२० किमी आणि पुणेपासून १५९ किमी अंतरावर वसलेले आहे . कराड हे शहर कोयना नदी आणि कृष्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे ज्याला आम्ही "प्रीतिसंगम" असे म्हणतो. या दोन नद्या महाबळेश्वर मध्ये उगम पावतात.
महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटक क्षेत्र आहे . जे सातारा जिल्ह्यातच स्थित आहे आणि जे कराड पासून १०० किमी दूर आहे . आणि त्या दोन नद्या म्हणजेच कृष्णा नदी आणि कोयना नदी आपल्या मूळ ठिकाणाहून म्हणजेच महाबळेश्वर मधून विभक्त होतात आणि समान अंतरावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास करून त्या "कराड " मध्ये भेटतात, ज्याला आपण "प्रीतिसंगम " असे म्हणतो. "प्रीतिसंगम" म्हणजेच " प्रेमसंगम ".
"कराड " हे शहर अजून एका गोष्टीसाठी ओळखले जाते ते म्हणजे 'साखर उत्पादनासाठी '. कराड शहराला "साखरेचे भांडे " म्हणूनही ओळखले जाते . कारण कराड तालुक्यात बरेच साखर कारखाने उभे आहेत . कराडला पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे केंद्र मानले आहे कारण कराड मध्ये प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. हे स्थळ विश्रांती स्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते.
महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय . यशवंतराव चव्हाण यांची समाधी सुद्धा कृष्णा आणि कोयनेचा संगमावर म्हणजेच "प्रीतिसंगमावर " वसलेले आहे . सर्वात अभिमानाची बाब म्हणजे 'भारत सरकारने' चालू केलेल्या "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " च्या अंतर्ग
त पारितोषिक सुद्धा भेटले आहे .
Sunday, April 19, 2020
How To Select A Stocks For Intraday Trading ?
Add caption |
So many people said that for IntraDay Trading. There is requirement for only volatility stocks. They was not wrong but i think . This is my personal opinion. Volatility is not the only thing which is required for IntraDay stocks. On my point of view. You only focuses on volatility but forget nesure picture. According to me , what i feel, There is 3 aspects for intraday stocks.
- Volume
- Volatility
- Vix.
If there is no volume is stock, these stocks are not right for intraday. Volume is important because if stock goes high, it means there is big trader enter in the stock. If you find that which stock volume goes high it means those stocks goes high.
Volatility
Volatility is most important for IntraDay Trading. Because if there is no volatility in the stock. Stock price doesnt increase.
Vix
Vix means Globally what happens in Share Market. You must find out and you must know what things going on.
Globally means 1. What is National News
2. Indian Market staying
Bullish or Not
3. News of Stocks.
4. Intraday Factors.
If you work on these points no one can beat you in IntraDay.
In IntraDay Factors, there is a lot of things which is help you to find out stocks selection for IntraDay.
Before you find out volume you must find out Vix.
How to find out vix for IntraDay ?
1. First you search " Vix Index India" in google search.
2. Select first which is from money control app.
3. Normal Range of Vix is 10-12.
4. Suppose Vix is 49.74. It means Vix is high (Volatility high) . Globally Indian Market is good for intraday.
Now find out Volume of stocks for IntraDay.
1. Goto website of "www.chartlink.com". It is very simple to use. After open chartlink window. It seems to be
2. Go to
Screeners
(create scan)
|
Green plus(+) button
|
Volume
|
Select Operaton
(greater than)
|
Number
|
Volume
|
Latest
|
1 Day
|
Run scan
After that we saw lot of stocks but we cant watch all the stocks so after that we find limited stocks which is Bluechip stocks.
Once again we scan the stock. These stocks may be more than 500 or less than 500. Steps are also same.
Scan
Select again Green (+) button
/
Select operation (close)
\
Select operation (Greater than)
/
Number (500)
\
Run Scan
After that we saw limited stocks,which we want to find. After that we go to our charts . We select indicators. Mostly I select MACD, M FLOW, MOVING AVERAGES ,VWAP.
I also write on these indicators in coming days.
Wednesday, April 15, 2020
Best Ghavan Recipe In Very Easy Steps In Home
Marathi Recipe Ghavan
Ghavane is really popular in Kokan. It is basically a rice pancake somewhat like neer Dosa. But it taste totally different from neer Dosa. It is quick break fast recipe.
Ingredients -
- 1 Cup rice flour.
- Salt to taste.
- Water.
- Oil.
Methods -
- In a mixing bowl, take rice flour, Add salt and mix well.
- Add water, stir well , No lumps should be formed .
- Add little water for a time and mix well, it should be thin and not too thick.
- Heat pan on medium heat.
- When a pan is enough hot, add oil. Spread the oil all over the pan.
- Mix the rice batter well , while preparing ghavan put the batter on the side of the pan first and after come to the center.
- Covers and cook for a minute, Remove the lid and cook for another 4-5 minutes.
- Flip over and cook for 2-3 min.
- Take it off the pan and serve hot Ghavan.
- Ghavan go well with mushroom sabzi or chicken.
- Can be Served with peanut or green chutney too.
Tuesday, April 14, 2020
To Study The Construction Of Stationary Anode X-ray Tube
GLASS ENCLOSURE
- It is necessary to seal the two electrode of the X-ray tube in a vaccum.
- If gas were present inside the tube the electrons that were being accelerated towards the cause secondary elecrons enjected from the gas molecule.
- By this process additional electrons would be available for accelerated for towards the anode.
- This production of the secondary electrons could not be satisfactorial controlled.
- This presence would result in variation in the number and more strikingly in the reduced speed of electron imping on the target.
- This would cause a wide variation in tube current and in the energy of x-ray produced. This is called as ionization.
- Actually this principle was used in the gas x-ray tube, which contains small amounts of gas the serve as a source of secondary electron.
- The negative terminal of x-ray tube is called the 'Cathode'.
- Filament is used as the cathode in x-ray tube.
- The filament which is the source of electrons for the x-ray tube. The cathode has two other elements thses are
- The connecting wire which supply both voltage(about10v) and current(3-5 A)
- Metallic focusing cup.
- The no of x-ray produced depends on th no. of elctrons.
- The filament is made up of tungsten wire about 0.2 mm in diameter that is coiled to form a vertical spiral about 0.2cm in diameter.
- When metal is heated its atom absorb thermal energy and some of the electrons in the metal acquire enough energy to allow them to move a small distance from surface of the metal .
- This is called as the Thermonic Emission.
- Which may be defined as the emission of electrons resulting from the absorption of thermal energy.
- Electrons emitted from the tungsten filament from a small could in the intermediate vicinity of the filament. This collection of negatively charged electrons is callled as Space Charge.
- The tendency of the space charge to limit emission of more electrons from the filament is called as the Space Charge Effect.
- X-rays are eletromagnetic waves of very short wavelength.
- They are not detected by an electric field or a magnetic field.
- It is travel in straight line.
- They affected photographic lines\ plates.
- In air or vaccum, they travel with speed of light.
- They ionise the gas through which they pass.
असं काय झालं की महाराजा जय सिंह यांना ब्रिटिशांना धडा शिकवावा लागला.
रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...
-
रोल्स रॉयस खरेदी करून महाराजा जय सिंह यांना का दाखवावी लागली ब्रिटिशांना त्यांची जागा प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयस ( Rolls Royce ) ही भारत...
-
कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात वसलेल्या खिद्रापूर या गावी महादेवाचे कोपेश्वर मंदिर हे...